संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
एका अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीला पैश्यांचे आमिष दाखवून व जिवे ठार मारण्याची धमकी देत अत्याचार होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मागील एका वर्षापासून हा प्रकार त्या मुलीसोबत होत आहे. घरी कोण नसल्याचा गैरफायदा घेत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना दौंड तालुक्यातील कानगाव मध्ये घडली आहे. वीस रुपयांचे आमिष दाखवून ११ वर्षाच्या मुलीवर अत्याचार हा नराधम करीत होता. याची माहिती मुलीच्या आई-वडिलांना मिळाल्यानंतर आरोपीविरोधात त्यांच्यातर्फे पोलीस ठण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आता या नराधमाला यवत पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या पाटस पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अटक केली आहे व विविध कलमांतर्गत या आरोपीच्या मुसक्या पोलीसांनी आवळल्या आहेत. मागील वर्षभरापासून हा प्रकार होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
पोलीसांनी बाल लैंगिक प्रतिबंधक कायद्यासह इतर कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मयूर पांडुरंग फडके असे अटक केलेल्या नराधम आरोपीचे नाव आहे. तो दौंड तालुक्यातील कानगाव येथील रहिवासी आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर पाटस पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांनी तत्काळ आरोपी मयूर फडके यास अटक केली.
आरोपी मयूर फडके याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांनी संबंधित माहिती प्रसिद्धी माध्यमांना दिली.