संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
खंडणीखोर (आयपीएस) अधिकारी सौरभ त्रिपाठीचा निलंबनाचा प्रस्ताव मुंबई पोलीसांकडून महाराष्ट्राच्या गृह विभागाकडे पाठवण्यात आला आहे. सौरभ त्रिपाठी हे अंगडिया खंडणी प्रकरणातील आरोपी आहेत. एलटी मार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओम वंगाटे, एपीआय नितीन कदम आणि उपनिरीक्षक समाधान जमदाडे अशा तीन अधिकाऱ्यांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी ओम वंगाटे यांनाही अटक करण्यात आली आहे. वंगाटे पोलीस चौकशीत सौरभ त्रिपाठी यांच्या सांगण्यावरुन खंडणी मागितल्याचे सांगितले होते.
ओम वंगाटे या पोलीस अधिकाऱ्यावर खंडणी उकळल्याचा आरोप आहे. लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात ओम वंगाटे हे पोलीस निरीक्षक आहेत. अंगडिया व्यावसायिकांकडून खंडणी उकळल्याचा आरोप वंगाटे यांच्यावर आहे. खंडणीप्रकरणी ओम वंगाटे यांना अटक करत सोबत अन्य तीन अधिकाऱ्यांवरही खंडणी आणि लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. २०२१ वर्षातील डिसेंबर महिन्यात अंगडिया व्यापार करणाऱ्यांना आयकराची भीती दाखवत पैसे उकळले होते. पोलीसांची वागणूक आणि पोलीस ठाण्यातील नोंद यात तफावत आढळ्याचं समोर आल्यानंतर अनेकांवर कारवाई करण्यात आली. मुंबई क्राईम ब्रांचकडून खंडणी उकळल्या प्रकरणी अधिक तपास सुरु करण्यात आला. उपायुक्त सौरभ त्रिपाठी गेल्या काही दिवसांपासून पोलीस स्टेशनला न आल्यानं अधिक संशय बळावला. आता चौकशीतून इतरही अनेकांची नावं समोर येण्याची शक्यता आहे.