मिरा भाईंदर: शिवसेना प्रभाग क्र.१९ च्या वतीने प्रभागातील लोकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेले शिवसेनेचे उप शहर प्रमुख मुस्तफा वनारा यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने शिव जयंती साजरी केली.
संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३७२ वा जयंती सोहळा (तिथीनुसार) सोमवार दिनांक २१ मार्च २०२२ रोजी नुपूर नगर येथे प्रभाग १९ च्या वतीने संपन्न झाला.
शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त माझी वसुंधरा अंतर्गत पर्यावरण संरक्षणासाठी व आमचा प्रभाग स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रभाग १९ मध्ये प्लास्टिकच्या पिशवी न वापरण्याचे आवाहन करण्याते येत असून शाखेतर्फे प्रभागातील लोकांना मोफत कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.
शिव जयंती नमित्ताने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात प्रभागातील लोकांनी मोठ्या उत्साहात भाग घेऊन या कापडी पिशव्या वाटपाचा भरपूर लाभ घेतला व निश्चय केला की आम्ही बाजारात जाताना कापडी पिशवीच सोबत घेऊन जाऊ!
शिवसेना उप शहर प्रमुख मुस्तफा वनारा व विभाग प्रमुख दिलीप सावंत यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.