Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

आई ‘पाओला माइनो’ यांच्या निधनाने सोनिया गांधी यांना मातृशोक..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आई पाओला माइनो यांचे निधन झाले आहे. शनिवारी २७ ऑगस्ट रोजी त्यांचे इटली मध्ये निधन झाले आणि मंगळवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सध्या सोनिया गांधीही परदेशात असून काँग्रेस चे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनीही सोनिया गांधी यांच्या आईच्या निधनाला दुजोरा दिला आहे. त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. सोनिया गांधी २४ ऑगस्ट रोजी उपचारासाठी देशाबाहेर गेल्या होत्या. त्यांच्यासोबत प्रियांका वाढरा व राहुल गांधीही होते.

जयराम रमेश यांनी सांगितले की, सोनिया गांधी उपचारासाठी परदेशात गेल्या असून यावेळी राहुल गांधी आणि प्रियांका वाढरा ही त्यांच्यासोबत असतील. आपल्या आजारी आईची प्रकृती जाणून घेण्यासाठी त्या जाणार आहेत. त्यानंतरच त्या दिल्लीत परतणार असल्याचे जयराम रमेश यांनी सांगितले होते. याचा अर्थ सोनिया गांधी बहुदा आपल्या आईच्या मृत्यूपूर्वी त्यांना भेटल्या होत्या आणि त्यांची प्रकृती जाणून घ्यायची होती. मात्र, आतापर्यंत सोनिया गांधी यांच्या आईचे निधन आणि त्यांच्या अंत्यसंस्काराबद्द्ल फारशी माहिती समोर आलेली नाही असे प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *