संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत
अतिवृष्टी झाल्याने अचानक उद्भवलेल्या पूर परिस्थिती मूळे चिपळूण येथील काही गावांवर फार मोठे संकट ओढावले आहे. पावसाच्या अतिवृष्टीमुळे डोंगर-कडा कोसळून गावातील घरे जमिनीखाली गाडली गेली असून लोकांच्या डोक्यावरचे छत हिरावले गेले आहे.
मा.पोलीस उप आयुक्त श्री. बाळासाहेब पाटील वाहतूक विभाग ठाणे व सहा.पोलीस आयुक्त श्री.उमेश माने पाटील वाहतूक विभाग कल्याण यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली वाहतूक उपशाखेचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजश्री शिंदे व अंमलदार यांनी स्वेच्छेने केलेली मदत तसेच साईश ग्रुपच्या श्रीमती राजश्री पवार यांच्या संयुक्त विद्यमाने पूरग्रस्त बाधित कुटुंबियांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी पूरग्रस्त भागातील रहिवाशांना गहू, तांदूळ, डाळ, तेल व कपडे इत्यादीने भरलेला एक टेम्पो मा.पोलीस उप आयुक्त वाहतूक विभाग ठाणे यांनी पोलीस उप आयुक्त कार्यालय तीन हात नाका ठाणे येथून हिरवा झेंडा दाखवून आज रवाना केला.
सदर कार्यक्रमास मा.पोलीस उप आयुक्त वाहतूक विभाग ठाणे, वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी हजर होते.