संपादक: मोईन सय्यद/ मुंबई प्रतिनिधी
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात दाखल गुन्ह्यात सहआरोपी असलेले पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांना पुढील सुनावणीपर्यंत अटक केली जाणार नाही,
अशी हमी राज्य सरकारतर्फे मे. उच्च न्यायालयात देण्यात आली.
पठाण यांनी अटकेपासून दिलासा देण्याच्या आणि गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
न्यायमूर्ती एस. एस. शिंदे व न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने पठाण यांच्या याचिकेवरील पुढील सुनावणी ५ ऑगस्टला ठेवली आहे.
तोपर्यंत पठाण यांना अटक केली जाणार नाही,
अशी हमी मुंबई पोलिसां तर्फे देण्यात आली आहे.
मीरा भाईंदरचे विकासक श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून मरिन ड्राईव्ह पोलिसांनी परमबीर सिंह, अकबर पठाण आणि आणखी इतर चारजणां विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यापैकी मिरा भाईंदरच्या शिवसेनेच्या आमदार गीता जैन यांचा भाऊ संजय पुनमिया आणि विकासक सुनील जैन यांना अटक करण्यात आली असून या दोघांना आधी सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती त्यामध्ये आणखी सात दिवसांची वाढ करण्यात आली असून मुंबई पोलीस त्यांची कसून चौकशी करीत आहेत.