संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
कोरोना संसर्गामुळे संपूर्ण राज्यात आणि देशभर टाळेबंदी असताना गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशातून धुळे-नाशिक मार्गे येणाऱ्या अनेक खाजगी ट्रॅव्हल्स बसेस अडवून कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. शेकडोंनी हे प्रवासी आंतरजिल्हाच नाही तर आंतरराज्यात प्रवास करत होते. इ-पास नसताना आणि कोणतेही महत्वाचे कारण नसताना रोज शेकडो लोकांचा प्रवास सुरू होता.
महाभयंकर कोरोनाचा प्रादुर्भाव इतर जिल्ह्यात तसेच राज्यात पसरू नये म्हणून राज्य सरकारने लॉकडाऊन करून इतर जिल्ह्यात तसेच राज्यात प्रवास करण्यास बंदी केली आहे. या बंदीचा वटहुकूम काही खाजगी ट्रॅव्हल्स बसेस वाले पाळत नसून फक्त प्रवाश्यांकडून दामदुप्पट पैसे कमावण्याच्या दृष्टीने शेकडो प्रवाश्यांची ने-आण करतात व कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवतात म्हणून अश्या खाजगी बसेसवर कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी त्यांना अडवून त्यांच्यावर कारवाई केली आहे असे कल्याण बाजारपेठ पोलिसांनी प्रसिद्धीमाध्यमांना सांगितले.