संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
काटाई- खोपोली द्रुतगती महामार्गावरील बदलापूर खोणी नाका या परिसरात एक दुचाकी गेल्या काही दिवसांपासून बेवारस अवस्थेत आढळून आली होती. कोळसेवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना सदर दुचाकी आढळून आली असताना ती दुचाकी ज्या दुचाकी मालकाची आहे त्यांस हुडकून काढून शहर वाहतुक शाखा कोळसेवाडी यांच्या तर्फे संपर्क करून बदलापूर (पूर्व) पोलीस ठाण्याचे कर्मचारी पोह. पंढरीनाथ काळे, पोशि. सुनील सांगळे सोबत ट्रॅफिक वॉर्डन मनोज शिरोसे, रामचंद्र उज्जैनकर व शिवाजी पाटील यांच्या हस्ते सदर दुचाकी वाहन मालकांस सोपवण्यात आली म्हणून सदर कोळसेवाडी शहर वाहतूक शाखेच्या कर्तव्य तत्पर कर्मचाऱ्यांवर सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.