संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: गणेश नवगरे
गोसावी समाज हा पुर्वाकाळापासुन भिक्षुकच आहे. दारोदारी भिक्षा मागणे हा व्यवसाय असुन डवरी गोसावी यांचा दारोदारी जाऊन अमोषा वाढ माई, त्याच बरोबर मंदीरासमोर गाय ऊभीकरुन दिवसभर ऊना पावसात पोटाची खळगी भरण्यासाठी उभे रहावे लागते त्याच बरोबर नाथपंथी गोसावी समाज हा किंगरी वाजवत दशक्रियावीधी उत्तर कार्य करुन देणारे, परंतु लॉकडाऊनचे जाचक नियम असल्या कारणाने या समाजाला कुटूंबाचा उदरनिर्वाह करणे कठीन झाले आहे. तर गोधंळी गोसावी यांचा मुळ व्यवसाय गळ्यात संभळ बांधुन लग्नाचे, देवीच्या नावाने जागरण गोंधळ घालुन भवानीमातेच्या आशिर्वादाने सुखी घर संसार नांदावा म्हणुन देवांचे गोधंळ घालणे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात लॉकडाऊनमुळे नियमांचे ऊल्लंघन न करता या नाथपंथी गोसावी समाजाला दारापासुन घरापर्यंत मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. या समाजाचे आरक्षण हे NT(B) या प्रवर्गात येत असून त्यात कित्येक भटकंती करून आपली उपजिविका भागविणारया जाती उपजातींचा समावेश असून आरक्षण फक्त अडीच टक्के असल्यामुळे सरकारी नोकरदार हे मोजकेच आहेत, हा समाज मोठ्या प्रमाणात असूनही विखूरलेला असल्यामुळे याला कोणत्याच राजकीय पक्षाचे नेतृत्व नाही त्यामुळे केंद्र सरकार, अथवा राज्यसरकारने या समाजासाठी जातीने लक्ष देवून विषेश पॅकेजची व्यवस्था करणे फार गरजेचे आहे जेणेकरुन या समाजातल्या लोकांचा उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न सुटेल.