संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
कोपरगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयात आज कोरोना लस देण्याच्या वेळी आरोग्य विभागाकडून नियोजनाचा अभाव दिसून आल्याने उपस्थित तरुणांच्या सहनशीलतेचा बांध फुटल्याने अखेर या ठिकाणी नागरिकांना पांगविण्यासाठी शहर पोलिसांना पाचारण करावे लागल्याची नामुष्की दिसून आली असून या बाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे व कोविड साथीत नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये असे आवाहन अनेकांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केले आहे.
या बाबत आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फौलसुंदर यांनी दुजोरा दिला आहे. मात्र सविस्तर माहिती,”जाऊद्या” म्हणून टाळली आहे. याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी, नियोजन कोलमडल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. मात्र त्या ठिकाणी लाठी चार्ज केल्याच्या घटनेला थेट उत्तर देणे टाळले आहे. मात्र अनेक उपस्थितांनी मात्र या घटनेला दुजोरा दिला आहे. दरम्यान हीच स्थिती तालुक्यातील अन्य प्राथमिक आरोग्य केंद्रांवर होती.
राज्यात लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला असून त्यामध्ये १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. पण लोकसंख्येच्या प्रमाणात लसी उपलब्ध नसल्याने राज्यात काही ठिकाणीच, कमी प्रमाणात या वयोगटातील लोकांचे लसीकरण करण्यास सुरुवात झाली. पण राज्यातील लसीकरणाच्या अभियानासमोर आणखी एक समस्या निर्माण होत असून त्या काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाही. अशीच घटना कोपरगाव तालुक्यात घडली असून कोपरगाव तालुक्यात प्रथम आज वय वर्ष १८ ते ४४ नागरिकांना लस देण्याचे आवाहन काल करण्यात आले होते.
त्यासाठी ठिकाणाचे शहर आरोग्य विभागाने नियोजन केले होते व त्यासाठी ग्रामीण रुग्णालयात छोटाशा मंडपात सोय करण्यात आली होती. त्या साठी एकूण तीनशे लसी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. मात्र ‘लसी कमी आणि नागरिकांची मोठी उपस्थिती’ असे विचित्र चित्र निर्माण झाले होते. त्यासाठी या लस इच्छुकांना संदेश देताना मात्र काही नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात भ्रमणध्वनिवरून देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्ष लस देताना व्यवस्था भलत्याच ठिकाणी केलेली होती.मात्र वय वर्ष १८ ते ४४ साठी सोय कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात केली होती. तर लघु संदेश लस देण्याच्या काही मिनिटं आधी देऊन लस धारकांची नावे सामाजिक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामुळे त्या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी करून गोंधळ उडालेले दिसून आला. त्या मुळे हा संताप अखेर तरुणाईने आरोग्य विभागाचे नियोजनासाठी लावण्यात आलेले टेबल खुर्च्या उधळण्यापर्यंत हा गोंधळ वाढल्याने अखेर आरोग्य विभागाला शहर पोलिसांना पाचारण करावे लागले. शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन त्या ठिकाणच्या तरुणाईला आटोक्यात आणले आहे.
या बाबत आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फौलसुंदर यांनी दुजोरा दिला आहे. मात्र सविस्तर माहिती,” जाऊद्या…” म्हणून टाळली आहे. याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,” नियोजन कोलमडल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे”. मात्र त्या ठिकाणी लाठी चार्ज केल्याच्या घटनेला थेट “उत्तर देणे” टाळले आहे.मात्र अनेक उपस्थितांनी मात्र या घटनेला दुजोरा दिला आहे.
कोपरगाव आरोग्य विभागाच्या कारभाराचा थेट फज्जा उडण्याची हि पहिलीच घटना असली तरी आरोग्य विभागाच्या गलथान कारभाराची लक्तरे या आधी वेशीला टांगली गेली असून अनेक रुग्णांना कोरोना रुग्ण तपासणी संचचा अभाव, रेमडीसीविर इंजेक्शन, ऑक्सिजन, खाटांची कमतरता यांच्या बाबत सविस्तर वृत्त छापून आले आहे. पुढाऱ्यांची प्रसिद्धीची “अधिकची हौस” दिसून आली आहे. नागरिकांना त्यामुळे मोठी किंमत चुकवावी लागली आहे. आलेल्या नागरिकांना उभे राहण्यासाठी सुरक्षित अंतर राखण्यासाठी उपाययोजना करण्यात आलेले नव्हत्या. पाण्याची व्यवस्था आदींचा अभाव दिसून आला आहे. ह्या गर्दीमुळे कोरोना प्रसार होण्याची शक्यताच अधिक बळावली आहे. त्याबाबत आरोग्य विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. कोपरगाव तालुक्यात नेमके किती कोरोना रुग्ण, किती मृत्यू याचा प्रसिद्धी माध्यमांसकट कोणालाही थांगपत्ता नाही हा या तालुक्याच्या कारभाराचा विशेष असे म्हटले जाते.