संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
नाशिक येथील लॅमरोड भागात रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळय़ातील सुमारे सव्वा लाखाची सोनसाखळी दुचाकीस्वारांनी लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी शिला रमेशचंद्र अग्रवाल (वय: ७० वर्षे) राहणार साईशांती भवन, लॅमरोड यांनी तक्रार दाखल केली असून देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिला अग्रवाल या रविवारी सायंकाळच्या सुमारास शेजारी राहणाऱ्याच्या घरी जात असतांना ही घटना घडली. रस्त्याने त्या पायी जात असताना पाठीमागून आलेल्या मोपेड दुचाकीवरील एकाने त्यांच्या गळयातील वजनी पॅण्डल असलेली सोनसाखळी असा सुमारे १ लाख २५ हजार रूपये किमतीचा ऐवज हिसकावून नेला. याचा अधिक तपास देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पाडवी करीत आहेत असे प्रसिध्दी माध्यमांना सांगण्यात आले.