संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
सध्या देशभरात ओमीक्रॉन बीए.२ या कोरोना संसर्गच्या चौथ्या लाटेत कोविडची प्रकरणे पुन्हा वाढताना दिसत आहेत. विशेषतः दक्षिणेकडील राज्य केरळ, कर्नाटक या राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
कार्यालये, शैक्षणिक आणि गृह संकुलासाठी संस्थांसाठी जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, मास्क लावणे आणि शारीरिक अंतर राखणे बंधनकारक करण्यात आले आहे.
नवीन निर्देशांनुसार लक्षणे असलेल्या सर्वांना रॅपिड अँटीजेन चाचणी (RAT) करणे बंधनकारक आहे. जर ती सकारात्मक आढळली तर स्वतः क्वारंटाईन व्हावे, असे निर्देश राज्य शासनाच्या वतीने देण्यात आले आहेत.