संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ‘ईडी’ने दोन महिन्यात आज तिसऱ्यांदा छापेमारी केली. अधिकारी मुश्रीफ यांच्या निवासस्थानातून ४ वाजून ३५ मिनिटांनी बाहेर पडले.
आज झालेल्या कोल्हापूरात छापेमारीमध्ये मुश्रीफ यांच्या कुटुंबीयांची कागलमधील निवासस्थानी तब्बल साडे नऊ तास चौकशी करण्यात आली. ‘ईडी’च्या पथकाने येताना सोबत प्रिंटरही आणला होता. अधिकाऱ्यांनी सर्वांचा जबाब नोंदवून घेतला आहे. आतापर्यंत झालेल्या छापेमारीत तिन्ही वेळची एकच टीम होती. मात्र, आजच्या टीममध्ये अधिक अधिकाऱ्यांची संख्या होती.
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याशी निगडीत कर्ज प्रकरणांची ‘ईडी’कडून हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित ‘ईडी’कडून चौकशी सुरु आहे. आतापर्यंत ‘ईडी’कडून हसन मुश्रीफ यांचे निवासस्थान, पुण्यातील ब्रिक्स कंपनीशी निगडीत तसेच सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना, मुलीचे घर, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्यालय तसेच कागल तालुक्यातील सेनापती कापशी आणि गडहिंग्लज तालुक्यातील हरळी येथील जिल्हा बँकेच्या शाखेवर छापेमारी करण्यात आली आहे. आतापर्यंत केलेल्या छापेमारीचा कोणताही तपशील समोर आलेला नाही. हसन मुश्रीफ यांच्याविरोधात आतापर्यंत ‘ईडी’कडून ३५ कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मुरगूड पोलीस ठाण्यातही त्यांच्यावर ४० कोटींचा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कागलमध्ये मुश्रीफ यांच्या निवासस्थानी ‘ईडी’ची छापेमारी साडे नऊ तास सुरु होती. सकाळी सात वाजता ‘ईडी’चे पथक कागलमध्ये पोहोचले. छापेमारी सुरु असताना मुश्रीफ यांची दोन मुले घरी होती. दरम्यान, हसन मुश्रीफ अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी मुंबईत आहेत. मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा यांनी घरात लहान मुलं तसेच मोठा मुलगा आजारी असतानाही ‘ईडी’कडून चौकशी होत असल्याची प्रतिक्रिया माध्यमांना दिली होती.