संपादक; मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
कोरोना च्या भीषण महामारीत खासगी रुग्णालयांकडून मोठ्या प्रमाणात बिल आकारणी केली जात आहे. त्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. त्यामुळे यापुढे प्रत्येक खासगी रुग्णालयात दररोज नेमून दिलेले ऑडिटर जातील आणि रोजच्या रोज बिलांची तपासणी करतील. कोणत्याही हॉस्पिटलकडून जर बिलाच्या बाबतीमध्ये गफलत केली आणि रुग्णाला त्रास दिला तर गाठ माझ्याशी आहे, असा सज्जड दम ‘उपमुख्यमंत्री मा.अजित पवार’ यांनी सातार्यात दिला. दरम्यान, मी मज्जा करायला आलेलो नाही, मला रिझल्ट हवा आहे. यंत्रणा हलवा, नाही तर कारवाई होणारच, असा “इशारा” त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिला.
या बैठकीस आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे, पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई, खा.श्रीनिवास पाटील, खा.रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आ.पृथ्वीराज चव्हाण, आ.शिवेंद्रराजे भोसले, आ.मकरंद पाटील, आ.जयकुमार गोरे, आ.महेश शिंदे, आ.दीपक चव्हाण, आ.अरुण लाड, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.