_
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा कल्याण ग्रामीण आणि इतर संस्थांच्या वतीने महाआरोग्य शिबिराचे आयोजन एमआयडीसी येथील गणपती मंदिर शेजारील पक्ष कार्यालयात करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन भाजपचे कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी केले.
यावेळी भाजप डोंबिवली ग्रामीण अध्यक्ष आणि विधानसभा संपर्क प्रमुख नंदू परब, गौतम पाठक, राकेश जैन, रवींद्र रंगा, माजी नगरसेवक जालिंदर पाटील, महिला ग्रामीण अध्यक्षा मनीषा राणे, माधुरी जोशी, रसिका पाटील, पंढरीनाथ म्हात्रे, भाजप प्रणित रिक्षाचालक संघटनेचे कार्याध्यक्ष संजय देसले, दत्ता मळेकर, रवी सिंग इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ऍंजियोग्राफी, ऍंजियोप्लास्टी, बायपास सर्जरी, टुडी एकॉकारडीयोग्राफी, मधुमेह, रक्तदाब, ईएनटी, दंतचिकित्सा, नेत्रतपासणी, मोतीबिंदू, इत्यादीची मोफत तपासणी तर आयुर्वेद उपचार, मोफत कानाचे मशीन, भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे आयोजन बाबत नंदू परब म्हणाले कि, ना.रवींद्र चव्हाण यांचा तळागाळातील जनतेसोबत सातत्याने संपर्क असतो. या जनतेचे आरोग्यासाठी सुविधा मिळणे गरजेचे आहे. कोवीड काळानंतर बेरोजगारी आणि ताणतणावात वाढ झाली असून अश्या परिस्थितीत प्रथम गरिबांना प्राथमिक आरोग्य सुविधा मिळायला हव्यात.
ना. रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त शिबिराच्या माध्यमातून या आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. एका छत्राखाली अश्या शिबिरामुळे गरजुंना विविध शारीरिक तपासण्यासाठी आर्थिक रित्या लाभ होतो असे शशिकांत कांबळे यांनी सांगितले. दुपारी ना. रवींद्र चव्हाण यांनी शिबिराची पाहणी करुन शिबिराबद्दल समाधान व्यक्त केले. कच्छ युवा संघटनेच्या वतीने सातत्याने रक्तदान शिबिराचे आयोजनासाठी त्यांचे कौतुक केले.
युवक प्रतिष्ठान, कच्छ युवक संघटना, सत्य साई प्लॅटीनम हाॅस्पीटल, सिध्दीविनायक हाॅस्पीटल, सिध्दीविनायक नेत्रालय, युवा आशापुरा मित्र मंडळ, डाॅ.अविनाश देशपांडे, डॉ.राजीव आढाव यांनी शिबिरास सहकार्य केले.