संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
आज डोंबिवली शहर वाहतूक शाखेतर्फे विशेष सुरक्षा जनजागृती मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये हेल्मेट, सिटबेल्ट व सिग्नल जंपिंग बाबत तसेच वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत आजच्या विशेष मोहिमेअंतर्गत डोंबिवली वाहतूक उपविभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.उमेश गीत्ते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री.नवनाथ चव्हाण आणि सहकारी कर्मचारी यांच्या सोबत डोंबिवली पूर्व हद्दीतील टिळक चौक, शेलार नाका, घरडा सर्कल येथे हेल्मेट, सिटबेल्ट न वापरणाऱ्या व सिग्नल मोडणाऱ्या चालकांना थांबवून हेल्मेट, सीट बेल्ट वापरण्याबाबतचे व सिग्नल पाळण्याबाबतचे सूचना फलक हाती देऊन, त्यांच्याकडूनच त्याबाबत वाहतूक सुरक्षा जनजागृती करण्यात आली.
तसेच रोटरी क्लब डोंबिवली सनसिटी यांच्याकडून विना हेल्मेट चालकांना हेल्मेट चे वाटप करण्यात आले.
डोंबिवली वाहतूक उपविभागाकडून आज हेल्मेट, सिटबेल्ट व सिग्नल जम्पिंग बाबत जनजागृती करण्यात आली आहे. यापुढे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून सर्वांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री उमेश गीत्ते यांच्याकडून करण्यात येत आहे.