कोल्हापूर, (१० सप्टेंबर) : आज कोह्लापुर येथे संघटनेची बैठक मा.विवेक म्हमाने पाटील केंद्रीय खजिनदार यानी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी जेष्ठ पत्रकार शहाजहान आत्तार सोलापूर यांची नियुक्ती जाहीर केली आहे.
यावेळी केंद्रीय सचिव हाजी अब्दुलभाई शेख उपस्थित होते. नूतन राज्य अध्यक्ष शहाजहान आत्तार यांचा शाल श्रीफल देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मा.अशोक पद्मने साहेब उपस्थित होते.
आत्तार यांच्या नियुक्ती बद्दल संपूर्ण राज्यात अभिनंदन होत आहे. यावेळी संघटनेचे पदाधिकारी व पत्रकारांनी शुभेच्छा दिल्या. नियुक्ती नंतर बोलताना आत्तार यानी संपूर्ण राज्याचा दौरा करुन राज्यातील प्रत्येक तालुक्यात सदर संघटना पोहचविण्याचा निर्धार व्यक्त केला व जिल्हाअध्यक्ष निवड लवकर करणार असल्याचे जाहीर केले.
शासन दरबारी पत्रकारांना पेंशन योजना मोफत, एसटी बस, रेल्वे प्रवास, शासनाच्या खुल्या जागांवर प्रत्येक जिल्ह्यात संघटनेचे कार्यालय पत्रकार भवन पत्रकार घर संकुल हाती घेण्यात येणार असल्याचे सांगितले व राज्य अधिस्वीकृति समितीवर AJFC चे दोन प्रतिनिधी घेणे बाबत शासनास भाग पाडू व या सर्व मागण्या बाबत तीव्र लढा संपूर्ण राज्यभर उभा करू असे जाहीर केले. याबाबत केंद्रीय अध्यक्ष व पदाधिकारी यांना घेऊन मा. मुख्यमंत्री व संबधित अधिकारी यांना शिष्टमंडळ घेऊन चर्चा करणार असल्याचे सांगितले.
तसेच AJFC पदाधिकारी व सदस्य यांचा अभ्यास दौरा शासन आयोजित करणार असल्याचे सांगितले. शेवटी केंद्रीय सचिव हाजी अंदुल भाई शेख यानी पुष्प गुछ देऊन त्याना शुभेच्छा देऊन सर्वांचे आभार मानले. केंद्रीय अध्यक्ष यासीन पटेल यांच्या मार्गदर्शना खाली एकमताने निवड केली.