संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने आज दिनांक ०७/०८/२०२२ रोजी सकाळी ७.०० वा. वाहतूक उपविभाग डोंबिवली च्या वतीने म्हसोबा चौक, ९० फूट रोड, ठाकुर्ली, डोंबिवली पूर्व येथे ५ कीलोमीटर दौड चे आयोजन करण्यात आले होते.
मा.श्री. दत्तात्रय कांबळे, पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा, ठाणे शहर यांचे शुभ हस्ते या दौडला सुरूवात झाली. यावेळी मा. श्री. सुनिल कुराडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग, श्री. महेश तरडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कल्याण वाहतूक उपविभाग, श्री. अजय आफळे, वपोनि टिळकनगर पोलीस स्टेशन, श्री. रवींद्र क्षीरसागर, वपोनि कोळसेवाडी वाहतूक उपविभाग व मानपाडा, रामनगर, विष्णुनगर व टिळकनगर पोलीस स्टेशन तसेच कोळसेवाडी, कल्याण व डोंबिवली वाहतूक उपविभागाचे ६० अधिकारी व अंमलदार तसेच १५० ते २०० नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
यावेळी ‘न्यू फोर्स अकॅडमी’ च्या बाल विद्यार्थ्यांनी दौडबरोबरच उत्कृष्ट परेड प्रात्यक्षिक करून उपस्थितांची मने जिंकली असे श्री. उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक, डोंबिवली वाहतूक उपविभाग यांनी प्रसिद्धी माध्यमातील उपस्थित पत्रकारांना सांगितले.