Latest News आपलं शहर देश-विदेश महाराष्ट्र

पोलीस उप निरीक्षकांना मूलभूत प्रशिक्षणासाठी पाठविण्याचा निर्णय – गृहमंत्री

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक सरळसेवा परीक्षा-२०१८ आणि खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षा २०१७ मधील पात्र एकूण ७३७ उमेदवारांना जून-२०२१ पासून नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमी येथे मूलभूत प्रशिक्षणासाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.

खात्यांतर्गत पोलीस उप निरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षा २०१७ मधील ३२२ उमेदवारांचे प्रशिक्षण सत्र दिनांक २१ जून पासून सुरु करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. तसेच पोलीस उप निरीक्षक सरळसेवा परीक्षा २०१८ मधील एकूण ३८७ उमेदवार तसेच २०१७ च्या प्रतीक्षा यादीतील २२ उमेदवार व सत्र क्रमांक ११८ मधील मुदतवाढ मिळालेले ६ उमेदवार अशा एकूण ४१५ उमेदवारांचे मुलभूत प्रशिक्षण २४ जून पासून सुरु करण्याचे गृह विभागाने प्रस्तावित केले आहे.

सदरचे प्रशिक्षण हे कोरोना परिस्थितीच्या अधिन राहून तसेच राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या कोरोना मार्गदर्शक तत्वांच्या अधिन राहून सुरु करण्यात येतील असेही, वळसे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *