संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
शिवसेनेचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत सध्या पत्राचाळ आर्थिक घोटाळाप्रकरणी तुरुंगात असून या प्रकरणी स्वप्ना पाटकर या मुख्य साक्षीदार आहेत. ‘ईडी’ने स्वप्ना पाटकर यांना चौकशीसाठी बोलावले असून याबाबत समन्स बजावला आहे. सध्या राऊत यांच्या कोठडीत ५ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात स्वप्ना पाटकर व संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या नावे जमीन खरेदी व्यवहार झाला असून, या प्रकरणात संजय राऊतांवर स्वप्ना पाटकर यांनी गंभीर आरोप केले आहे. यापूर्वी पत्राचाळ प्रकरणी स्वप्ना पाटकर यांचा जवाब ‘ईडी’ने नोंदविला असून, पाटकर काही नवीन माहिती देणार आहे, यामुळे संजय राऊतांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
सुजित पाटकर हे संजय राऊतांचे जवळचे व्यक्ती असून स्वप्ना पाटकर यांचे पती देखील होते, सध्या स्वप्ना पाटकर व सुजित यांच्यात घटस्फोट झाला आहे. ‘ईडी’ने स्वप्ना पाटकर यांना समन्स बजावल्याने त्यांना पुन्हा एकदा चौकशीकरिता हजर रहावे लागणार आहे. येत्या काळात स्वप्ना पाटकर काय खुलासा करतात यावर सर्वांचे लक्ष लागले असून लवकरच याप्रकरणी नवीन धागेदोरे ईडीला मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.