संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
आज दिनांक २५/०८/२०२१ रोजी मानपाडा पोलीस ठाणे गु.रजि. ६६५/२०१८ भादवी कलम ४५४,४५७,३८०,३४,४११,४१४ शस्त्र कायदा ४,२५ सह म.पो.का.क.३७(१)१३५ प्रमाणे दाखल ८,४३ ९०० रुपयांची डोंबिवलीतील सोनारपाडा येथील डी.एस.एजन्सी नावाचे गोडाऊन चे शटर उचकटून लोखंडी तलवार सोबत बाळगत झालेल्या चोरीच्या गुन्ह्यातील हवा असलेला फरार आरोपी नामे आकाश ऊर्फ बाटल्या राजू सिंग (वय: २१ वर्ष) राहणार अनंत शिंगटे चाळ, खरवई गाव, रामबाग बदलापूर (पूर्व) यास गुन्हे शाखा युनिट-३ च्या पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यात त्यास अटक केली आहे.
अटक आरोपी याच्या गुन्हे अभिलेखाची तपासणी केली असता त्याच्यावर खालीलप्रमाणे गुन्हे नोंद आहेत.
१) बदलापूर पोलिस ठाणे गु.रजि.६१/२०१८ भादवी कलम ३७९,३४
२) बदलापूर पोलीस ठाणे गु.रजि.१७१/२०१७ भादवी कलम ४५४,४५७,३८०,३४
३) बदलापूर पोलीस ठाणे गु.रजि.३०/२०१८ भादवी कलम ४५४,४५७,३८०,३४
४) शिवाजीनगर पोलीस ठाणे गु.रजि.३२९/२०१७ भादवी कलम ४५४,४५७,३८०
५) शिवाजीनगर पोलीस ठाणे गु.रजि. १९०/२०१६ भादवी कलम ४५४,४५७,३८०,३४
६) शिवाजीनगर पोलीस ठाणे गु.रजि.२३५/२०१६ भादवी कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे दाखल आहेत.
सदर आरोपीवर एकूण घरफोडीचे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात सात गुन्हे दाखल आहेत.
सदर आरोपी हा रात्री घरफोडी करण्यात अत्यंत हुशार आणि चपळ आहे. घरफोडी करताना त्याच्या जवळ तीक्ष्ण धारदार हत्यार बाळगायची त्याला सवय आहे. सदर आरोपी हा रेकॉर्डवरील खतरनाक गुन्हेगार असून घरफोडीचे बदलापूर पोलीस स्टेशनला ३ गुन्हे दाखल आहेत, बदलापूर शिवाजीनगर पोलीस स्टेशन ला ३ गुन्हे दाखल आहेत, आणि डोंबिवली येथील मानपाडा पोलीस स्टेशनला १ गुन्हा दाखल आहे असे एकूण ७ घरफोडीचे गुन्हे दाखल असून सदर आरोपीस आज मा. न्यायालयात हजर केले असता त्यास दि.२७/०८/२०२१ रोजी पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पी.एस आय मोहन कळमकर करत आहेत.
प्रस्तुत गुन्ह्याच्या तपासाची कामगिरी मा.वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक-३, कल्याणचे पोलीस निरीक्षक श्री. विलास पाटील, सपोनि भूषण एम.दायमा, पोउनि मोहन कळमकर, पोहवा दत्ताराम भोसले, मिथुन राठोड, अरविंद पवार, संदीप भालेराव, राजेंद्र खिलारे, प्रकाश पाटील,सचिन साळवी, मंगेश शिर्के, गोरक्ष शेकडे, गुरुनाथ जरग, राहुल ईशी, चित्रा इरपाचे, स्वाती काळे यांनी यशस्वीरित्या केलेली आहे.