संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत
जर तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) चे सदस्य असाल तर तुमच्यासाठी एक चांगली आणि मोठी बातमी आहे. मोदी सरकार या आठवड्यात साडेसात कोटी पीएफधारकांना चांगली बातमी देणार आहे.
बातमीनुसार, केंद्र सरकार पीएफ खात्यात व्याजाची रक्कम ३१ जुलैपर्यंत ठेवू शकते. खरेतर, अलीकडेच, केंद्र सरकारने २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी ८.५ टक्के व्याज मंजूर केले. आणि आता अशी अपेक्षा आहे की या आठवड्यात ही रक्कम सुमारे ६.५ कोटी पीएफ खातेदारांच्या खात्यात जमा होईल.
कामगार मंत्रालयाच्या मंजुरीनंतर, ८.५% दराने ‘ईपीएफओ’ ग्राहकांच्या खात्यात पैसे जमा होतील. आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये शेवटच्या वेळी KYC च्या गोंधळांमुळे बर्याच सदस्यांना बराच काळ थांबावे लागले.