Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

५ कोटी खंडणी च्या बदल्यात ‘ललित हॉटेल’ उडवून देण्याच्या धमकी प्रकरणी मुंबई पोलीसांची मोठी कारवाई..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबईच्या सहार विमानतळा शेजारील पंचतारांकित हॉटेल ‘द ललित’ मध्ये ४ ठिकाणी बॉम्ब ठेवलेत ५ कोटी दे नाहीतर संपूर्ण हॉटेलला उडवून देण्याची धमकी आल्यानंतर मुंबई पोलीसांनी या प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. यामध्ये एकाला अटक करण्यात आली असून त्याची कसून चौकशी केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबईतील प्रसिद्ध ललित हॉटेलला उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. ‘५ कोटी द्या नाहीतर चार ठिकाणी बॉम्ब ठेवले आहेत’, अशी धमकी काल देण्यात आली होती. या प्रकरणी आता पोलीसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलीसांनी यामध्ये गुजरातमधील वापी येथून २ संशयितांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील वलसाड आणि वापी येथून दोघांना ताब्यात घेतले आहे. सहार पोलीसांनी आरोपीची मानसिक स्थिती ठीक नसल्याची प्राथमिक माहिती दिली आहे. आरोपींनी पहिल्या कॉलमध्ये ५ कोटी आणि नंतर तडजोड करून ३ कोटींची मागणी केली होती. यासाठी त्याने हॉटेलमध्ये ४ बॉम्ब लावले असल्याचं धमकावलं.

मुंबईला उडवण्याच्या धमकीनंतर पोलीसांची सगळ्यात मोठी कारवाई, विरारमधून एकाला अटक

सहार पोलिसांनी आरोपीच्या शोधात गुजरात गाठले आणि दोघांना अटक केली. यानंतर आता पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती येत आहे. दरम्यान, मुंबईला दहशतवादी हल्ला करत उडवून देण्याची धमकी आल्यानंतर आता या धमकीच्या फोनने संपूर्ण मुंबई अलर्टवर गेली आहे. मुंबईतील ललित होटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी काल देण्यात आली होती. सोमवार संध्याकाळी फोन करून ही धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

एका अज्ञाताने ललित हॉटेलमध्ये फोन करून पैशांची खंडणी मागितली. यामध्ये त्याने तब्बल ५ कोटींची खंडणी मागितली आहे. हॉटेलमध्ये ४ ठिकाणी बॉम्ब ठेवले आहेत असं आरोपीने सांगितलं. या प्रकरणी पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये आता एकाला अटक करण्यात आली आहे. यामध्ये आता पुढे काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *