संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
दिवा येथे रविवारी भारतीय जनता पार्टीच्या उत्तर भारतीय आघाडीतर्फे ‘दिवा कजरी महोत्सव’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते व सदर कजरी महोत्सव धुमधाम आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. या कजरी कार्यक्रमात उत्तर प्रदेशातील बलिया येथून आलेल्या गायिका सुनीता पाठक यांच्या “पिया मेहंदी लिया दा मोती झील से, जायके साईकिल से” या कजरा गीताने उपस्थित श्रोते उल्हासित होऊन मंत्रमुग्ध झाले होते.
या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस माजी मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार संजय केळकर, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, तर भारतीय नेते प्रदेश उपाध्यक्ष अमरजीत मिश्रा, भटक्या विमुक्त आघाडीचे महासचिव शिवाजी आव्हाड, बिंदुरा फाउंडेशन च्या अध्यक्षा ऍडव्होकेट बिंदू दुबे, भाजपाचे अध्यक्ष रोहिदास मुंडे, महिला आघाडीचे अध्यक्षा ज्योती पाटील, युवा मोर्चाचे अध्यक्ष सचिन भोईर, सरचिटणीस श्रीयुत भोईर, सरचिटणीस समीर चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष नरेश पवार, प्रदेश भाजपाच्या महिला उपाध्यक्षा हर्षलाताई बुबेरा, रोशन भगत, उत्तर भारतीय आघाडी चे समशेर सिंग यादव, शीला गुप्ता, गौरीशंकर पटवा तसेच असंख्य उत्तर भारतीय कार्यकर्ते, नागरिक व महिला उपस्थित होत्या.