Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

भाजपच्या १६ मंत्री राजीनामा देत नितीशकुमार यांचे सरकार कोसळले; बिहारमध्ये राजकीय भूकंप !


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून नितीशकुमार यांचे सरकार कोसळले आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजप पासून अधिकृतपणे फारकत घेतली आहे. त्यानंतर ते आज दुपारी राज्यपाल फग्गु चौहान यांची भेट घेवून लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत नव्या आघाडी सरकारच्या स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. नितीशकुमार यांनी राज्यपालांच्या भेटीची वेळही मागितली आहे.

दरम्यान, नितीशकुमार यांच्या या भेटीपूर्वी भाजपच्या १६ मंत्र्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. या सर्वांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सादर केला असून नितीशकुमार सरकारचा पाठिंबा काढून घेतला असल्याचे पत्रही दिले आहे. उद्या किंवा परवा नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

नितीशकुमार आणि भाजपमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून शीतयुद्ध सुरू आहे. महिन्याभरातील घडामोडींवर नजर टाकल्यावर नितीश कुमार आणि भाजपमध्ये सर्व काही आलबेल सुरु असल्याचे दिसून येत नाही. नितीश कुमार यांनी एका महिन्यापासून भाजप पासून अंतर ठेवले आहे.

त्यामुळे नितीश कुमार आणि भाजपमध्ये काडीमोड होवून बिहारमध्ये ११ ऑगस्टपूर्वी ‘एनडीएचे सरकार’ पडेल आणि नितीश पुन्हा ‘राजद’ सोबत सरकार स्थापन करतील असे अंदाज बांधले जात होते.

 

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *