अवधुत सावंत, प्रतिनिधी : वाढत्या रुग्णसंख्येच्या पाश्र्वभूमीवर कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी उपाय योजावेच लागतील. यावर टाळेबंदी हा उपाय नाही हे मान्य आहे, पण त्याला पर्याय हवा आहे. दोन दिवसांत विविध तज्ज्ञ, राजकीय नेते आणि सर्व संबंधितांशी चर्चा करून निर्णय घेऊ. पर्यायी मार्ग न सापडल्यास लोकांचा जीव वाचवण्यासाठी नाईलाजाने टाळेबंदी करावी लागेल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिला.
कोरोना संसर्गाचे प्रमाण थोडे कमी झाल्यावर आपण गाफील राहिलो, पण त्याने पुन्हा डोके वर काढले. उपनगरी रेल्वे, उपाहारगृहांमध्ये गर्दी होत आहे.
घरगुती कार्यक्रमांनाही मोठी गर्दी होत आहे. परिणामी, कोरोनाची रुग्णसंख्या प्रचंड वेगाने व दुपटीने वाढत आहे.ती अशीच वाढत राहिली तर रुग्णालये तुडुंब भरतील.त्यामुळे अनावश्यक गर्दी आता टाळावीच लागेल, असे आवाहन राज्यातील जनतेशी समाजमाध्यमाद्वारे संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी केले.
टाळेबंदीची लगेचच घोषणा करत नाही
पण दोन दिवसांत परिस्थिती नियंत्रणात आली नाही आणि टाळेबंदीला पर्याय सापडला नाही तर टोकाचे पाऊल उचलावे लागेल, असा इशाराही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.
वर्षांच्या सुरुवातीला कोरोनाचे संकट नियंत्रणात आले असे वाटत होते. या काळात राज्याला पुढे नेणारा-अर्थव्यवस्थेला चालना देणारा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला.
पण त्यानंतर काही लोकांनी शिमगा सुरू केला. त्याला योग्यवेळी उत्तर देईन, आता कोरोना संकट महत्त्वाचे आहे. असे मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावले. कोरोना संकट आता आक्रोळविक्रोळ स्वरुपात परतले आहे. विषाणूचे नवे रूप आले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात पावणे चार लाख रुग्णांसाठी व्यवस्था सज्ज आहे.
रुग्ण वाढ झपाटय़ाने होत आहे.
महिनाभरात मुंबईतील परिस्थिती बिघडली आहे असंही ते म्हणाली व चिंता व्यक्त केली आहे.