Latest News आपलं शहर महाराष्ट्र

ठाणे जिल्ह्यात १४ जून ते २१ जून पर्यंत लॉकडाऊनचे नवीन निर्बंध – राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हाधिकारी

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे जिल्ह्यात नागरिकांची गर्दी होऊ नये आणि परस्पर संपर्क वाढून कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये,म्हणून १४ जून २०२१ ते २१ जून २०२१ पर्यंत नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहे.

विविध भागांमध्ये कोविड १९ बाधितांची कमी-अधिक प्रमाणातील रुग्ण संख्या विचारात घेऊन राज्य शासनाने विभागनिहाय वेगवेगळ्या स्वरूपात निर्बंध लागू करण्याचे निर्देश जारी केलेले आहेत. सन २०११ च्या जनगणनेनुसार प्रत्येकी १० लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ठाणे जिल्हयातील ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलो महानगरपालिकांचे क्षेत्र हे तीन स्वतंत्र प्रशासकीय घटक (Separate Administrative Unit) म्हणून विभागण्यात आले आहेत.

तर उर्वरित मिरा-भाईंदर, भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्र, अंबरनाथ, कुळगांव.बदलापूर नगरपरिषद / शहापूर, मुरबाड नगर पंचायत क्षेत्र व संपूर्ण ग्रामीण क्षेत्र हे एक एकत्रित स्वतंत्र प्रशासकीय घटक (Single Separate Administrative Unit) निर्माण करणेत आला आहे.

ठाणे, नवी मुंबई व कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्र स्वतंत्र प्रशासकीय घटक वगळून उर्वरित) एकत्रित स्वतंत्र प्रशासकीय घटक क्षेत्रामध्ये Levels of Restrictions for Breaking the Chain अंतर्गत स्तर ३ (Level 3) या स्तराचे निर्बंध खालीलप्रमाणे लागू करत आहे.

१) सर्व अत्यावश्यक सेवांची दुकाने सायं. ४.०० वा. पर्यंत सुरू राहतील.
२) अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर वस्तूंचा व्यवहार करणाऱ्या आस्थापना सोमवार ते शुक्रवार सायं. ४.०० वा. पर्यंत सुरू राहतील.
३) मॉल्स / सिनेमागृहे (मल्टिप्लेक्ससह सिंगल स्क्रिन / नाटयगृहे इत्यादी बंद राहतील.
४) रेस्टॉरेंट्स सोमवार ते शुक्रवार ५०% बैठक क्षमतेने सायं. ४.०० वा. पर्यंत सुरू राहतील. मात्र, सायं. ४.०० वा. नंतर व शनिवारी आणि रविवारी फक्त टेक अवे/ पार्सल सर्व्हीस आणि होम डिलेव्हरी सेवा सुरू राहील.
५) उपनगरीय लोकल वाहतूकीबाबत बृहन्ममुंबई महानगरपालिकेने निर्गमित केलेले आदेश लागू राहतील.
६) सार्वजनिक ठिकाणे/खुली मैदाने/चालणे/ सायकलिंग दररोज सकाळी ५.०० वा. पासून सकाळी ९.०० वा. पर्यंत सुरू राहतील.
७) खाजगी कार्यालये कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सायं. ४.०० वाजेपर्यंत (सुट देण्यात आलेली कार्यालये वगळून )सुरू राहतील.
८) कार्यालयीन उपस्थिती शासकीय कार्यालयांसह (खाजगी जर परवानगी असेल) ५०% क्षमतेने सुरू राहतील.
९) क्रिडा सकाळी ५.०० वा. पासून सकाळी ९.०० वा. पर्यंत फक्त मैदानी खेळांना परवानगी राहील.
१०) चित्रीकरण Bubble च्या आतमध्ये सायं. ४.०० वा. पर्यंत सुरू ठेवता येईल व सायं. ५.०० नंतर कोणासही हालचाल करता येणार नाही.
११) सामाजिक मेळावे / सांस्कृतिक / करमणूक ५०% बैठक क्षमतेने सोमवार ते शुक्रवार सायं. ४.०० वा पर्यंत सुरू राहतील.
१२) लग्न समारंभ फक्त ५० लोकांच्या मर्यादेतच करता येतील.
१३) अंत्यसंस्कार विधी फक्त २० लोकांच्या उपस्थितीमध्ये करता येईल.
१४) बैठका स्थानिक संस्थांच्या सहकारी संस्थांच्या निवडणुका हॉलच्या सभागृहाच्या ५०% बैठक क्षमतेने घेणेस परवानगी राहील.
१५) बांधकामाकरीता केवळ ऑनसाईट मजूर राहणाऱ्या ठिकाणी किंवा सायं. ४.०० वा. पर्यंत कामगारांनी कामाचे ठिकाण सोडले पाहिजे या अटीवर परवानगी असेल.
१६) कृषि सेवा दुकाने परवानगी दिलेल्या वेळेत सुरु राहतील.
१७) ई-कॉमर्स साहित्य व सेवा पूर्वीप्रमाणे नियमित सुरू राहतील.
१८) जमावबंदी सांय. ५.०० वा. पर्यंत व संचारबंदी सायं ५.०० वा. नंतर लागू राहील.
१९) व्यायामशाळा/ केश कर्तनालय / ब्यूटी सेंटर्स / स्पा / वेलनेस सेंटर्स सायं. ४.०० पर्यंत ५०% क्षमतेने सुरु राहतील, परंतु गिर्‍हाईकांना पूर्वनियोजित वेळ ठरवूनच यावे लागेल. तसेच वातानुकूलन यंत्रणेचा वापर करता येणार नाही.
२०) सार्वजनिक परिवहन सेवा १००% बैठक क्षमतेने सुरू राहतील. परंतु, प्रवाश्यांना उभे राहून प्रवास करता येणार नाही.
२१) मालवाहतूक जास्तीत जास्त ३ व्यक्तीसह वाहन चालक हेल्पर स्वच्छक किंवा इतर असे एकूण ३ लागू असलेल्या सर्व नियमांसह नियमितपणे सुरू राहील.
२२) खासगी कार / टॅक्सी / बस लांब पल्ल्याच्या गाड्यांद्वारे प्रवासासाठी (आंतर जिल्हा प्रवासासाठी स्तर ५० मधील कोणत्याही भागाकडे जात असल्यास किंवा त्यामधून जात असल्यास प्रवाशाकडे ई-पास असणे बंधनकारक राहील) नियमितपणे परवानगी राहील.
२३) उत्पादन निर्यातीचे बंधन पूर्ण करण्याची आवश्यकता असलेल्या एमएसएमईसह निर्यात करणारे युनिट नियमितपणे सुरू राहतील.
२४) उत्पादनाच्या अनुषंगाने
१. अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन करणारे युनिट (आवश्यक वस्तू आणि कच्चे माल / पॅकेजिंगचे उत्पादन करणारे घटक म्हणून वर्गीकृत केलेल्या वस्तू व आवश्यक असलेल्या पुरवठाच्या साखळीसह
२) सर्व सतत प्रक्रिया सुरू असणारे उद्योग (ज्या युनिट्ससाठी अशा प्रकारच्या प्रक्रियेची आवश्यकता असते.ज्या अशा प्रकारच्या स्वरूपाच्या असतात ज्यांना त्वरित थांबवता येत नाही आणि पुरेश्या वेळेशिवाय ते पुन्हा सुरू होऊ शकत नाही)
३) राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वस्तूंचे उत्पादन
४) अत्यावश्यक गंभीर स्वरूपाच्या पायाभूत सेवा सुविधा देणारे डेटा सेंटर / क्लाऊड सेवा देणारे प्रदाता /आयटी सेवा नियमित सुरू राहतील.
२५) उत्पादन सेक्टरमधील इतर सर्व उत्पादन युनिट, जे अत्यावश्यक सेवेत समाविष्ट केलेले नाहीत, परंतू निरंतर चालू ठेवणे आवश्यक आहेत, असे युनिट केवळ ५०% कर्मचारी क्षमतेने सुरू राहतील.
या आदेशाची अंमलबजावणी ठाणे जिल्हयातील मिरा-भाईंदर, भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्र, अंबरनाथ, कुळगांव-बदलापूर नगरपरिषद / शहापूर, मुरबाड नगर पंचायत क्षेत्र व संपूर्ण ग्रामीण क्षेत्र या एकत्रित स्वतंत्र प्रशासकीय घटक क्षेत्रांमध्ये करण्यात येणार आहे. सदरचे आदेश दि.१४ जून २०२१ रोजी सकाळी ७.०० वा. पासून दि.२१ जून २०२१ रोजी सकाळी ७.०० वा. पर्यंत लागू राहतील.
वरील आदेशाची सर्व संबंधितांनी तात्काळ अंमलबजावणी करावी. सदरहू आदेशाची अंमलबजावणी करण्यास कोणत्याही व्यक्तीने टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम ५१ ते ६०, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम, १८९७ व भारतीय दंड संहिता १८६० मधील कलम १८८ नुसार दंडनीय कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
असे आवाहन ठाणे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण राजेश नार्वेकर यांनी केले आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *