संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी घट झाली असली तरी देशातील महाराष्ट्र आणि मेघालय वगळता इतर राज्यांत तब्बल साडेतीन महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी गुरुवारी पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले मात्र किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
आंतरराष्ट्रीय बाजापेठेत कच्च्या तेलाच्या दरांत कमालीची घसरण झाली असली तरी भारतात मात्र दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. ८ फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच ९० डॉलर प्रति बॅरल उतरल्या असून जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घट दिसून येत आहे. ५ सप्टेंबर रोजी ‘ओपेक’ कडून मागणीतील घट आणि मंदीच्या भीतीनं ऑक्टोबरपासून १ लाख बॅरल प्रति दिवस उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
तेलाचे भाव स्थिर करण्याचा ‘ओपेक’चा प्रयत्न सुरु असला तरी कच्च्या तेलाच्या दरांत मोठी अस्थिरता आहे. ‘ओपेक’च्या निर्णयानंतर तेलाच्या किंमतीने उच्चांक गाठला. मात्र मागणीतच घट झाल्याने पुन्हा किंमती अस्थिर झाल्या. दरम्यान, ‘ओपेक’ कडून तेलाच्या दरांत मोठी वाढ झाल्यास त्याचा परिणाम थेट भारतावर होणार आहे.
महागाईवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न भारताकडून सुरु असून अशातच तेलाच्या दरांत मोठी वाढ झाली तर संपूर्ण प्रयत्न वाया जाणार आहेत. संपूर्ण जगात सध्या महागाईनं डोके वर काढले असून गॅसच्या किंमतीत कमालीची वाढ झाली आहे. अमेरिकेतही गॅसचे दर १३० टक्क्यांनी वाढले आहेत. तर युरोपात १२० टक्क्यांनी उंचावले आहेत. रशियाच्या ऊर्जा साठवणुकीस कॅप लावण्याचा विचार आहे. ज्यामुळे जागतिक स्तरावरील ऊर्जेचे दर वाढू शकतात. याचाही ज्याचा थेट परिणाम भारतावर होणार आहे.
देशातील पेट्रोल-डिझेलचे आजचे दर
इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने अधिकृत रित्या जारी केलेल्या दरांनुसार, आज देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ अथवा घट केलेली नाही. मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर तर दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे.