Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

महानगरपालिकेच्या उत्कृष्ट नियोजनामुळे अनंत चतुर्दशी विसर्जन सोहळा शांततेत संपन्न!

एकूण 2063 गणेश मूर्तींचे विसर्जन तर महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी विसर्जन स्थळांना भेट देऊन जातीने लक्ष देऊन केली पाहणी!

मिरा-भाईंदर, प्रतिनिधी: मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील पारंपारिक विसर्जन स्थळांसोबतच शहरात विविध ठिकाणी निर्माण करण्यात आलेल्या 3 कृत्रिम विसर्जन स्थळांवर तसेच नैसर्गिक तलाव/समुद्रात आणि मुर्ती स्वीकृती केंद्रांवर एकूण 2063 गणेश मूर्तींचे विसर्जन व्यवस्थितरित्या व शांततेत पार पडले.

महानगरपालिकेच्या वतीने मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या निर्देशानुसार सर्वच ठिकाणी करण्यात आलेल्या नियोजनबद्ध विसर्जन व्यवस्थेत अनंत चतुर्दशी विसर्जन सोहळा शांतरितीने पार पडला.

अनंत चतुर्दशी विसर्जन प्रसंगी एकूण 2063 श्रीगणेश मूर्तींना भावपूर्ण निरोप देण्यात आला. प्रभाग क्रमांक १ मध्ये नैसर्गिक तलाव/समुद्रात व कृत्रिम तलावात एकूण 100 श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

 

प्रभाग क्रमांक २ मध्ये नैसर्गिक तलावात/समुद्रात एकूण 265 श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

प्रभाग क्रमांक ३ मध्ये नैसर्गिक तलाव/समुद्रात एकूण 542 श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

प्रभाग क्रमांक ४ मध्ये नैसर्गिक तलाव/समुद्रात व कृत्रिम तलावात एकूण 573 श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

प्रभाग क्रमांक ५ मध्ये कृत्रिम तलावात एकूण 09 श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

प्रभाग क्रमांक ६ मध्ये नैसर्गिक तलावात एकूण 574 श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

अशाप्रकारे अनंत चतुर्दशी निमित्त एकूण 2063 श्रीगणेश मूर्तींना भावपूर्ण निरोप देण्यात आला.

मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी जातीने लक्ष देऊन शहरातील जरीमरी तलाव काशीमिरा, शिवार गार्डन, जेसल पार्क चौपाटी, भाईंदर पश्चिम चौपाटी याठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन विसर्जन स्थळांची पाहणी केली.

सदर पाहणी दरम्यान अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, उपायुक्त (मुख्यालय) मारुती गायकवाड, उपायुक्त (वैद्यकीय) संजय शिंदे, उपायुक्त (सार्व. आरोग्य) रवी पवार, कार्यकारी अभियंता नितीन मुकणे, जनसंपर्क अधिकारी तथा सिस्टम मॅनेजर राजकुमार घरत, अग्निशमन अधिकारी प्रकाश बोराडे, सहाय्यक आयुक्त प्रभाकर म्हात्रे, सहाय्यक आयुक्त चंद्रकांत बोरसे, सहाय्यक आयुक्त जितेंद्र कांबळे, सहाय्यक आयुक्त सचिन बच्छाव, सहाय्यक आयुक्त प्रियंका भोसले, इतर कनिष्ठ अभियंता, अग्निशमन कर्मचारी व महानगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.

आयुक्त ढोले यांनी जेसल पार्क चौपाटीवर विसर्जन स्थळी भव्य अश्या श्रीगणेशाच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करत श्रीगणरायाला वंदन केले.

गणेश विसर्जना मुळे शहरात वाहतूक कोंडी असल्याने आयुक्त व अधिकारी वर्ग यांनी भाईंदर पूर्व, जेसल पार्क चौपाटी ते भाईंदर पश्चिम चौपाटी असा बोटीमध्ये बसून प्रवास केला.

त्याच प्रमाणे शहरातील सर्व प्रमुख विसर्जन स्थळांवर आयुक्त यांच्या निर्देशानुसार नागरिकांसाठी कोव्हिड बूस्टर डोसचे देखील नियोजन करण्यात आले होते.

तसेच जेसल पार्क चौपाटी विसर्जन स्थळावर आमदार गीता जैन व मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त सदानंद दाते व पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी देखील प्रत्यक्ष भेट देऊन विसर्जन व्यवस्थेची पाहणी केली.

सर्वच विसर्जनस्थळांवर सुरक्षेच्या दृष्टीने बांबूंचे बॅरेकेटींग करण्यात आले होते. अग्निशमन सेवक, महानगरपालिका स्वयंसेवक यांच्यासह वैद्यकीय आरोग्य व सार्वजनिक आरोग्य सेवाही कार्यरत होते.

सर्व विसर्जन स्थळांवर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून पोलीस यंत्रणा तसेच सीसीटीव्ही यंत्रणा अत्यंत सतर्कतेने कार्यरत होती. अनंत चतुर्दशी दिवशी विसर्जन सोहळा सुव्यवस्थित रितीने संपन्न होण्यासाठी १ ते ६ प्रभाग समिती कार्यालय क्षेत्रात सर्व यंत्रणा सुसज्ज होत्या.

सहाय्यक आयुक्त व महानगरपालिका अधिकारी तसेच कर्मचारी यांनी अनंत चतुर्दशी व इतर विसर्जन सोहळ्यानिमित्त केलेल्या नियोजनाचे मा. आयुक्त यांनी समाधान व्यक्त करत सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद यांचे आभार व्यक्त केले.

तसेच शहरातील सर्व नागरिकांनी मिरा-भाईंदर महानगरपालिका प्रशासनास अनंत चतुर्दशी दिवशी व इतर विसर्जन सोहळ्यात उत्कृष्ट सहकार्य केल्याने आयुक्त दिलीप ढोले यांनी सर्व नागरिकांचे आभार व्यक्त केले.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *