Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

मराठा आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत नोकर भरतीला अटकाव घाला; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा !


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

अनेक वर्षांपासून राज्यात गाजत असलेल्या मराठा आरक्षणाचा मुद्दा अद्याप प्रलंबित असून यावर सत्ता परिवर्तन होऊन सुद्धा या मुद्द्यावर तोडगा निघण्याचा कुठलाही मार्ग सध्यातरी दिसत नाही आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे परंतु महाविकास आघाडी सरकारमध्ये याबाबत कुठलेही ठोस पाऊले उचलण्यात आले नाही, त्यामुळे हल्लीच्या सरकारकडून क्रांती मोर्चाला आशा लागून आहे. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तोपर्यंत नोकरभरती थांबवा, असे साकडेच सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड तालुका क्रांती मोर्चाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घातले आहे. यावर महिनाभऱ्यात काहीतरी तोडगा निघावा अशी मागणी क्रांती मोर्चाने केली आहे, अन्यथा नाईलाजाने १० ऑक्टोबर पासून आम्ही बेमुदत आमरण उपोषण करणार, अशा आशयाचे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना नुकतेच देण्यात आले आहे.

मराठा समाजाचे आरक्षण रखडल्याने समाजातील अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होत असल्याची बाब निवेदनात नमूद करण्यात आली. यामुळे अनेक गुणवंत विद्यार्थी नोकरीपासून वंचित होत आहे, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारे धक्का न लावता मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली निघत नाही तोपर्यंत नोकरभरती थांबवा, अन्यथा आम्ही बेमुदत आमरण उपोषणाचा पर्याय निवडू, असा विनंतीवजा सूचक इशारा मराठी क्रांती मोर्चाने दिला आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *