संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: मिलन शाह
सीबीएसई बोर्डाकडून यंदाची बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि विविध राज्यातील शिक्षण मंडळांनी घेतला होता.
पण कोरोनाची दुसरी लाट आणि वाढती रुग्णसंख्या पाहता बारावीच्या परीक्षांवर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे सीबीएसईची बारावीची परीक्षा आता रद्द करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयातही बारावी परीक्षाप्रकरणी याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी आता ३ जून रोजी होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारला आपली बाजू सर्वोच्च न्यायालयातही मांडावी लागणार आहे.