Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

नवरा बायकोच्या घरगुती भांडणात मद्यधुंद अवस्थेत असलेला दारुड्या नवऱ्याने पोलीसाच्याच कानशिलात लगावली..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

नवरा बायकोच्या घरगुती भांडणात मद्यधुंद अवस्थेत असलेल्या नवऱ्याने पोलीस ठाण्यातच धिंगाणा घालत पोलीसाच्या कानशिलात लगावल्याची घटना आज कोनगाव पोलीस स्टेशन मध्ये घडली आहे. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात नवऱ्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेला नवरा दरवाज्यावर लाथा मारत असल्याची पोलीसांना फोनवरून तक्रार आली. त्यानुसार पोलीस कर्मचाऱ्याने नवऱ्याला पोलीस ठाण्यात पकडून आणले असता, मद्यधुंद नवऱ्याने पोलीस ठाण्यातच धिंगाणा घालत पोलीसाच्या कानशिलात लगावल्याची घटना येथे घडली आहे. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात नवऱ्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. रितेश चिंदू चव्हाण (वय: ३४, रा. उल्हासनगर) असे अटक केलेल्या नवऱ्याचे नाव आहे.

नवऱ्याला घाबरून बायकोने केला होता पोलीस ठाण्यात फोन

नवरा रितेश हा उल्हासनगर मधील गजानननगर परिसात राहतो. नवरा बायकोमध्ये घरगुती वाद झाल्याने पत्नीने घटस्फोट मिळावा म्हणून न्यायालयात दावा केला होता. तेव्हापासून नवरा बायकोमध्ये वाद आधीच वाढल्याने आरोपीची बायको भिवंडी तालुक्यातील पिपंळघर येथील एका इमारतीमध्ये एकटी राहते. त्यातच बायको आपल्याला सोडून एकटी राहत असल्याचे पाहून रितेश उल्हासनगरहुन २४ एप्रिल रोजी संध्याकाळच्या सुमारास ती राहत असलेल्या घरी आला. त्यावेळी बायकोने नवरा आल्याचे पाहून दरवाजा बंद केल्याने त्याने शिवीगाळ करत दरवाज्याला लाथा मारण्यास सुरुवात केली. या घटनेने घाबरून बायकोने कोनगाव पोलीस ठाण्यात फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस नाईक पांडुरंग वणवे हे घटनास्थळी येऊन मद्यधुंद अवस्थेत असलेल्या नवऱ्याला पकडून पोलीस ठाण्यात आणले.

पोलीस ठाण्यातील दालनातच मद्यपी नवऱ्याने घातला धिंगाणा

पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र पवार यांच्या दालनात त्याला हजर करून पवार यांनी त्याच्याकडे नाव, पत्ता विचारला असता त्याने सांगण्यास नकार देऊन पोलीस ठाण्यातील दालनातच धिंगाणा घातला. हे पाहून पोलीस नाईक वणवे यांनी त्याला शांत राहण्याचा सल्ला दिला. मात्र आरोपी नवऱ्याला त्याचा राग येऊन खाकी वर्दीत असलेले पोलीस नाईक वणवे यांना शिवीगाळ व धमकी देत, त्यांच्या कानशिलात लगावली. त्यामुळे पोलीस ठाण्यात अधिकच गोधंळ उडाला होता.

मद्यपी नवऱ्याची रवानगी पोलीस कोठडीत

त्यानंतर पोलीसांनी नवऱ्याला ताब्यात घेऊन पोलीस नाईक वणवे यांच्या तक्रारीवरून विविध कलमांनुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. आज (२५ एप्रिल) आरोपी नवऱ्याला न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील करत आहेत.

 

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *