संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
सविस्तर वृत्त असे की कल्याणच्या बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारा रेकॉर्डवरील गुंड आरोपी फारीस इस्तीयक खोत राहणार: बाबू शेठ चाळ, चौधरी मोहल्ला, दुधनाका (कल्याण) हा कोणता तरी अपराध करण्याच्या उद्देशाने राम मारुती चौक ह्या ठिकाणी एक लोखंडी सुरा घेऊन फिरत आहे अशी पोलीस नाईक बागुल यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती. त्या अनुषंगाने बाजारपेठ पोलीस स्टेशनचे वपोनि.नरेंद्र पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनखाली बाजारपेठ डिटेक्शन ब्रांच चे सपोनि.अरुण घोलप व त्यांच्या डिटेक्शन टीमने आरोपी फारीस इस्तीयक खोत याला धारदार लोखंडी सुऱ्यासह शिताफीने पकडुन त्याच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)१३५ प्रमाणे कारवाई केलेली आहे.
सदरची कामगिरी वपोनि. नरेंद्र पाटील, पोनी राजेंद्र अहिरे/(गुन्हे), सपोनि अरुण घोलप, पोहवा. पावशे, पोहवा. जातक, पोना. सचिन साळवी, पोना. प्रेम बागुल, पोना. परमेश्वर बाविस्कर, पोना. राज सांगळे यांनी केली असून सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक सचिन साळवी हे करीत आहे.