संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
पावसाळा जवळ आला आहे.२५ मे च्या अगोदर सर्व रस्त्यावरील खड्डे, प्रलंबित कामे
मार्गी लावा अशा सुचना राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सून २०२१ पुर्वतयारी बाबींच्या पूर्वतयारीची ऑनलाईन आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाषदादा पवार, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे, ठाणे महानगर पालिका आयुक्त बिपीन शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.शिवाजी पाटील, पोलीस आयुक्त सदानंद दाते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.कैलास पवार यांसह सर्व महानगरपालिकांचे आयुक्त व विविध विभागांचे अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी सहा महानगर पालिकांचे आयुक्त यांच्याकडून मान्सुन पुर्व तयारी ऑनलाईन आढावा घेतला व संबधिताना सुचना केल्या. प्रलंबीत कामे, नालेसफाई, रस्तावरील खड्डे, यांची कामे त्चरीत मार्गी लावा. आपत्ती काळात मदतीसाठी बोटी भाड्यांनी घेऊन ठेवणे असेही ते बोलले.
कोरोनाचा प्रादुभार्व असल्यामुळे पावसाळ्यात विज खंडीत होणार नाही यासाठी विद्युत विभागाने विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोना सेंटरची पावसामुळे काही नुकसान होणार नाही यांची काळजी संबधीतानी घ्यावी. अती धोकादायक इमारतीमधून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्याचा सुचना पालकमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.