संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एमआयडीसी (निवासी) भागात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. त्यामुळे अनेक नागरिक बाधित होत आहेत तर कित्येक नागरिकांचे कोरोना मुळे निधन झाले आहे. या भागातील कोरोनाचा संसर्ग अटोक्यात यावा यासाठी महापालिकाद्वारे लसीकरण करण्याची मागणी एमआयडीसी शिवसेना शाखेच्या वतीने खासदर डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
एमआयडीसी निवासी विभाग आणि आसपासच्या ग्रामीण भागात कोरोनाची झपाट्याने वाढ होत आहे. यंदाच्या दुसऱ्या लाटेत करोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. अनेक गंभीर रुग्णांचे निधन झाले आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लवकरात लवकर लसीकरण करणे गरजेचे आहे. यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या माध्यमातून एमआयडीसी आणि आसपासच्या परिसरातील ग्रामीण भागासाठी लसीकरण केंद्र त्वरित सुरु करावे अशी मागणी एमआयडीसी निवासी शिवसेना शाखेच्या वतीने विभागप्रमुख धर्मराज शिंदे यांनी खासदर डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शाखेत शनिवारी निवेदन देण्यात आले.