संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
नवाब मलिक यांच्या वर ईडी च्या अटकेनंतर नंतर दोनच दिवसात मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या घरी इन्कम टॅक्स विभागाचे पथक दाखल झालं आहे. कारवाईचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई करण्यात आल्यामुळे राष्ट्रवादी नंतर आता शिवसेना केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवरआहेत का? अशा चर्चांना उधाण आले आहे.
इनोव्हा गाड्यांमधून पथक यशवंत जाधव यांच्या घरी दाखल झाले. CISF टीम देखील उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. यशवंत जाधव हे शिवसेना उपनेते आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष आहेत. त्यांच्या पत्नी यामिनी यशवंत जाधव या भायखळा मतदार संघाच्या आमदार आहेत. त्यांच्या घरावर इन्कम टॅक्स विभागाने आज सकाळीच छापेमारी सुरु केली आहे. त्यांच्या घरासमोर तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, जानेवारी महिन्यात किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांची ‘मनी लॉन्ड्रिंग’ केल्याचा आरोप केला होता. एवढेच नाही तर आयकर विभागाच्या हाती पुरावे लागले आहेत. जाधव यांचे पितळ उघडे करण्यासाठी आयकर विभागाला पाठपुराव्यास मदत करणार असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले होते.