संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
कांदिवलीमध्ये गोळीबार झाला आहे. येथे दुचाकीवरुन आलेल्या २ जणांनी ४ राऊंड फायरिंग केली आहे. या फायरिंगमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. दरम्यान जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचे उघड झाले असून दहीहंडीच्या वेळी वाद झाला होता, त्यातूनच हा गोळीबार करण्यात आला. रात्री १२ वाजून १५ मिनिटांनी ही घटना घडल्याची माहिती मिळाली असून या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
काय घडले ?
शुक्रवारी रात्री १२ वाजून १५ मिनिटांनी ही घटना घडली. यावेळी दोन तरुण दुचाकीवरुन आले आणि त्यांनी बेछूट गोळीबार करण्यास सुरुवात केली. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. अंकित यादव असे या तरुणाचे नाव आहे. या घटनेमध्ये तीन जण जखमी झाले आहेत. अंदर्गत वादातून हा प्रकार घडला आहे. दहीहंडीच्या वेळी या दोन गटांमध्ये वाद झाला होता. याच वादातून हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. या फायरिंग दरम्यान तरुणाने चार गोळ्या झाडल्या आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार फायरिंग केल्यानंतर आरोपी हे तिथून फरार झाले आहेत. गोळीबार करणारे आणि जखमी हे एकमेकांना ओळखत होते. या फायरिंगमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले. अंकित यादव असे मृत तरुणाचे नाव आहे. तर अवीनाश दाभोळकर, मनीष गुप्ता आणि प्रकाश नारायण अशी इतर जखमींची नावे आहेत. जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. फरार झालेल्या आरोपीचा पोलीसांकडून शोध घेतला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कांदिवली पोलीस करत आहेत.