संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
मराठी रंगभूमी वरील आघाडीचे अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे हृदयविकाराने आज पहाटे त्यांच्या मुंबईतील राहत्या घरी ( झावबावाडी, चर्नी रोड ) येथे निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते.
मराठी रंगभूमीवर ‘मोरूची मावशी’, ‘बायको असून शेजारी’, ‘लग्नाची बेडी’ यासह असंख्य मराठी नाटकात तसेच मराठी चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपटात आपल्या सहजसुंदर अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे सदाबहार अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने मराठी कलासृष्टीने उमद्या कलावंताला गमावले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली असून एक गुणी, निगर्वी स्वभावाचा सहजसुंदर अभिनय करणारा अभिनेता आपण गमावला असे म्हटले आहे