संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
शिवसेना नेते खासदार संजय राऊत अटकेत असलेल्या पत्राचाळ प्रकरणातील कंत्राटदारांची ही चौकशी करण्यात यावी अशी मागणी आमदार सुनील राऊत यांनी केली आहे, दरम्यान संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत याही ‘ईडी’ समोर हजर झाल्या होत्या.
पत्राचाळ व्यवहारात संजय राऊत यांना प्रवीण राऊत यांनी रोख रखमेत फायदा दिला, तसेच वर्षा राऊत यांच्या खात्यातून पैसेही दिले असा ‘ईडी’ चा आरोप आहे, यासाठी या पूर्वी वर्षा राऊत यांची चौकशी झाली आहे. संजय राऊत यांना अटक केल्यानंतर पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलावले होते व त्या हजर झाल्या होत्या.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना सुनील राऊत यांनी कंत्रादारांचीही चौकशी करण्याची मागणी केली, भाजप नेते मोहित कंबोज हेही यातले एक कंत्राटदार आहेत.