Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

संजय राऊतांच्या “रोखठोक” प्रश्नी ईडी सतर्क..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

संजय राऊतांनी शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून रोखठोक सदर लिहिलं आणि ईडी आणखी सतर्क झाली. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटकेत असलेले राऊत हे तुरुंगातून लेख लिहायला स्वातंत्र्यसेनानाही आहेत का? असा प्रश्न मनसेचे संदीप देशपांडेंनी विचारला होता. ‘ईडी’च्या कोठडीत असताना राऊतांनी लिखाण कसं काय केलं, या प्रकरणी ‘ईडी’ तपास करणार असल्याच बोलले जात आहे. तुरुंगात असताना कोणतीही व्यक्ती अशा प्रकारे लेख लिहू शकत नाही. लेख लिहायचा असेल, तर न्यायालयाच्या विशेष परवानगीची आवश्यकता असते. त्याशिवाय लेख लिहिता येत नाही. म्हणूनच आता या प्रकरणात ‘ईडी’कडून संजय राऊतांची चौकशी होणार असल्याचं वृत्त आहे. रविवारी सामनामध्ये प्रकाशित झालेल्या रोखठोक या सदरात संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर कठोर टीका केली होती.

मुंबईतून राजस्थानी आणि गुजराती गेले तर मुंबईत पैसा शिल्लक राहणार नाही, असं विधान कोश्यारी यांनी केलं होतं. जेव्हा मराठी उद्योजक साखर कारखाने, गिरण्या आणि इतर उद्योग चालवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ‘ईडी’ त्यांच्यावर कारवाई करते. त्याबद्दलही राज्यपाल कोश्यारींनी काहीतरी बोलायला हवं. असे राऊतांनी आपल्या लेखात नमूद केले होते, या रोखठोकबद्दल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी टीका करत शंका उपस्थित केली होती. आता या प्रकरणाची ‘ईडी’कडून चौकशी केली जाणार आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *