संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
विध्यार्थी, पालक, बालक आणि बालकांचे शिक्षक यांचे राष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचे योगदान असते, त्यामुळे आता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या उचित साधून “घरोघरी तिरंगा” या उपक्रमाच्या जनजागृतीसाठी महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या निर्देशानुसार शिक्षण विभागाने देखील कंबर कसली असून महापालिकेचे शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांचे मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये तसेच महापालिका परिक्षेत्रातील इतर शाळांमध्ये देखील “घरोघरी तिरंगा” या उपक्रमासाठी दिनांक ०१ ऑगस्ट पासून शालेय विद्यार्थ्यांच्या प्रभात फेऱ्या घेण्यात येत आहेत, त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने हा उपक्रम घरोघरी पोहोचविण्याच्या अनुषंगाने महापालिकेच्या प्रत्येक शाळेत पालक सभा ही आयोजित करण्यात येत आहे आणि आता “घरोघरी तिरंगा” या उपक्रमाच्या जनजागृतीसाठी गुरुवार दिनांक १२ ऑगस्ट २०२२ रोजी कल्याण व डोंबिवली विभागांतर्गत शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी, एनएसएस, एनसीसी, स्काऊट गाईड चे विद्यार्थी त्यांच्या भारतीय संस्कृती पोशाखातील प्रभाग फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.
कल्याण मध्ये या प्रभाग फेरीचा प्रारंभ १२ ऑगस्ट रोजी सकाळी ८.०० वाजता बिर्ला महाविद्यालयातून होणार असून बिर्ला महाविद्यालय- आरटीओ कार्यालय – वाणी विद्यालय – साई चौक – राधानगर – वायले नगर – त्रिवेणी गार्डन – शासकीय गोडाऊन – लालचौकी – पारनाका – गांधी चौक – सुभाष मैदान येथे पोहोचून सामूहिक राष्ट्रगीता नंतर या प्रभाग फेरीची सांगता होईल तर डोंबिवली मध्ये गुरुवारी सकाळी ८.०० वाजता सावळाराम क्रीडा संकुल घरडा सर्कल येथून प्रभाग फेरीचा प्रारंभ होणार असून सावळाराम क्रीडा संकुल – घरडा सर्कल – शेलार नाका, शाळेकडून, गोग्रासवाडी रोड – गोपाल नगर मार्ग – टायटन शोरूम जवळून टिळक पुतळा चौक मार्गे फते अली शाळा येथे पोहचून सामूहिक राष्ट्रगीतानंतर या प्रभाग फेरीची सांगता होईल असे या प्रभात फेरीचे नियोजन असल्याचे शिक्षणाधिकारी विजय सरकटे व वंदना गुळवे उपायुक्त (शिक्षण संस्था) यांच्या कडून प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले आहे.