संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
दि.२.११.२०२१ रोजी सायंकाळी ६:३० वा दरम्यान मानपाडा पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील हद्दपार (तडीपार) केलेला इसम कैलास सुभाष जोशी उर्फ जेपी हा त्रिमुर्ती नगर झोपडपट्टीत त्याचे राहते घरा जवळ उभा आहे, अशी त्याचे वर्णनासह गुप्त बातमीदारा कडून खात्रीशीर बातमी पोलीस हवालदार दत्ताराम भोसले, मुख्यालय ठाणे शहर यांना मिळाल्याने, त्यांनी तात्काळ गुन्हे शाखा युनिट-३ चे मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर पाटील यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून कळवले असता, वपोनि मनोहर पाटील यांनी विलंब न लावता त्यांचे मार्गदर्शनाखाली योग्य त्या सूचना देऊन तात्काळ डोंबिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत फरारी गुन्हेगार व पाहिजे असलेले आरोपींचा शोध घेत असलेले एक पोलीस पथक सपोनि भूषण दायमा, पोउपनि मोहन कळमकर, सपोउपनि संजय माळी, पोलीस हवालदार विश्वास माने, वसंत बेलदार, सचिन वानखेडे, गुरुनाथ जरग, महेश साबळे, उमेश जाधव आणि राहुल ईशी असे सदर बातमी मिळाल्या ठिकाणी तात्काळ रवाना केले.
त्रिमुर्तीनगर झोपडपट्टीत त्याचे घरा चे बाजूलाच गल्ली जवळ सदर इसम उभा होता, मिळालेल्या वर्णनाप्रमाणे त्यास पथकातील एका पोलीसांनी ओळखले परंतु त्याचे घराचे पुढील व मागील बाजूने पोलीसांनी घेराव केल्याने त्यास पळून जाण्याची संधी न देता जागीच पकडले असता त्याचे नाव विचारता त्याने आपले नाव- कैलास सुभाष जोशी उर्फ जेपी (वय ३५ वर्ष) रा. पोपट किराणा स्टोर च्या मागे रूम नं. ०५ त्रिमुर्तीनगर झोपडपट्टी, पाथरली डोंबिवली पूर्व असे सांगितले सदर इसम हा अटल घरफोडी, चोरी करणारा आणि अतिशय चपळ असल्याने मानपाडा, डोंबिवली, विष्णूनगर,असे पोलीस ठाण्यात घरफोडी, चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत, नागरिकांच्या मालमत्तेस नुकसान पोहोचवू नये म्हणून त्यास मा.पोलिस उप आयुक्त सोा, परिमंडळ -३ कल्याण यांचे आदेशान्वये दि.२६.१०.२०२१ रोजी पासून ०१ वर्षे कालावधी करिता ठाणे जिल्ह्यातून हद्दपार (तडीपार) करण्यात आलेले असताना त्याने सदर आदेशाचा भंग केल्याने त्याच्या वर गुन्हे शाखा युनिट-३ कल्याण चे पोलीसांकडून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे कायदेशीर कारवाई करून पुढील तपासा करिता डोंबिवली पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून सदर तडीपार केलेल्या अट्टल घरफोडी चोरी करणाऱ्या गुन्हेगारावर गुन्हे शाखा युनिट-३ कल्याण चे पोलीसांनी कारवाई करून जेरबंद केल्यामुळे पोलीसांचे उत्कृस्ट कामगिरीचे नागरिकांकडून जाहीररीत्या कौतुक होत आहे.