संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
दिनांक २३/०२/२०२३ रोजी ११.३० ते १२.०० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी देवराज मेघजी बारवाडी (वय: ४४ वर्षे) धंदा:- फुटवेअर व्यवसाय डोबिवली पश्चिम हे त्यांचे सारस्वत बँक डोंबिवली पूर्व येथे बँकेत काम असल्याने त्यांची मोटार सायकल स्कुटी सुझुकी ऍक्सेस – एमएच०४ केके ५२७६ ही पीपी चेंबर जवळ असलेल्या सारस्वत बँकेच्या मेन गेटच्या समोर ‘सिल्वर कॉईन बिल्डींग’ येथे स्कुटी पार्क करुन बँकेत कामानिमीत्त गेले असता कुणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांची ७०,००० रुपये किंमतीची स्कुटी ही चोरी केली म्हणुन फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून डोंबिवली पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि क्र.७२/२०२३ कलम ३७९ भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
नमुद गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने सपोनि योगेश सानप, पोहवा. विशाल वाघ, भणगे, लोखंडे, पोअं. राठोड, गवळी यांनी तपासादरम्यान चोरीस गेलेली सुझुकी ऍक्सेस स्कुटी ज्या ठिकाणीवरून चोरीस गेली त्या परीसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहणी करून त्याचा मागोवा घेत सदर आरोपीस राहत असलेल्या परीसर तुकाराम रसाळ चाळ, लोढा, डोबिवली पूर्व या ठिकाणी पाळत ठेवून सदर आरोपीस ताब्यात घेवुन त्यास अटक करण्यात आली व त्याच्याकडून नमुद गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटार सायकल स्कूटी सुझुकी ऍक्सेस एमएच ०४ केके ५२७६ ही हस्तगत करण्यात आली.
सदरची कामगिरी मा. पोलीस उपायुक्त, परिमंडळ-३,कल्याण चे सचिन गुंजाळ, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग सुनिल कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर, पोनि (गुन्हे) तडवी, यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि योगेश सानप, पोहवा. विशाल वाघ, सचिन भालेराव, भणगे, लोखंडे, पोअं. राठोड, गवळी, पोना. कोती यांनी कामगीरी पार पाडली.