Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने लाच मागितली म्हणून मानपाडा पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक वर लाचखोरीचा गुन्हा दाखल..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

 

मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील प्रकरणात आपल्या वरिष्ठांनी सहकार्य केले आहे आणि ते यापुढे ते करतील. त्यासाठी ५० हजार रुपये द्यावे लागेल, अशी मागणी करणाऱ्या एका पोलीस नाईक पदावरील कर्मचाऱ्याच्या विरोधात त्याच मानपाडा पोलीस ठाण्यात लाचखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितिन राठोड असे या पोलीस नाईकचे नाव आहे. नाईक पदावर कार्यरत असलेला हा पोलीस पोलीस उपनिरीक्षक मुसळे यांचा लेखनिक आहे. पोलीस उपनिरीक्षक मुसळे यांच्याकडे एक गुन्हा तपासासाठी आला आहे. या गुन्ह्यातील आरोपीला आणि त्याच्या पत्नीला पोलीस उप निरीक्षक मुसळे यांनी सहकार्य केले आहे आणि ते यापुढेही करतील, असे पोलीस नाईक नितिन राठोड याने या प्रकरणातील आरोपीला सांगितले. मात्र त्यासाठी साहेबांना ५० हजार रुपये द्यावे लागतील, असेही त्याने सांगितले.

या पैशांसाठी पोलीस नाईक राठोड यांनी आरोपीकडे तगादा लावला होता त्यामुळे आरोपीने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली या तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक सुरेश चोपडे आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक शहानिशा केली. चौकशीदरम्यान पोलीस नाईक राठोड याने आरोपीकडे ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. आरोपी आणि पोलीस नाईक राठोड यांच्यात झालेल्या तडजोडी नंतर ४० हजार रुपये देण्याचे ठरले. तपासादरम्यान ४० हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याची नोंद मानपाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *