Latest News आपलं शहर

मराठा आरक्षणाची कायदेशीर लढाई शांततेत व समन्वयाने जिंकू! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेनी व्यक्त केला विश्वास!

अवधूत सावंत, प्रतिनिधी : मराठा आरक्षणाची मा.सर्वोच्च न्यायालयीन लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे. ही कायदेशीर लढाई शांतपणे, एकत्र येऊन एकजुटीने लढू आणि जिंकू, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केला.
मराठा आरक्षणासंबंधी मा.सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी संदर्भात मराठा समाजातील विविध संघटनांच्या समन्वयकांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला व मराठा आरक्षणासंदर्भातील सुनावणीच्या सद्यस्थितीची माहिती देऊन त्यांचे यासंदर्भातील मुद्दे जाणून घेतले.
यावेळी मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, खासदार विनायक राऊत, मुख्य सचिव सीताराम कुंटे आदी यावेळीस उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, संघटनांच्या प्रतिनिधींनी चर्चेत जे मुद्दे मांडले त्याची दखल घेण्यात आली आहे.
आरक्षणासंदर्भात ज्येष्ठ विधिज्ञ भक्कमपणे शासनाची बाजू मांडत आहेत.
आरक्षणाची हा खटला वेगळ्या वळणावर आला आहे.
खासगी याचिकाकर्त्यांनाही आरक्षणाच्या समर्थनार्थ बाजू मांडण्याची संधी मिळाली आहे.
ज्या खासगी याचिकाकर्त्यांना आपले म्हणणे मांडायचे आहे, त्यांनी शासनाबरोबर संघटनात्मक कार्य पद्धतीने एकेक मुद्दा मांडून तसे समर्थनार्थ आवश्यक पुरावे सादर करावेत.

मराठा समाजाच्या इतर मागण्यासंदर्भात लवकरच बैठक घेऊन आपण हे प्रश्नही सोडवू.

मराठा आरक्षणाच्या खटल्यासंदर्भात खासगी याचिकाकर्त्यांच्या वकिलांची बैठक घेऊन कोणते मुद्दे मांडायचे, पुरावे कशा प्रकारे सादर करायचे यासंदर्भात एकत्र बसून निर्णय घ्यावा, अशी सूचना ठाकरे यांनी यावेळी केली. मा.सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाची सुनावणीतील राज्य शासनाच्या मुद्द्यांची दखल घेतली आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *