प्रतिनिधी: अवधुत सावंत
नोंदणीकृत कामगारांच्या खात्यात १५०० रुपयांचे अर्थसाह्य त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये थेट जमा करण्यात आले आहेत
राज्यात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर गोरगरीब बांधकाम कामगारांना आर्थिक मदत जाहीर राज्य सरकारच्या वतीने करण्यात आली होती. त्यानुसार आता नोंदणीकृत असलेल्या बांधकाम कामगारांची संख्या दीड लाखाच्या आसपास असून त्यापैकी ९ लाख १७ हजार नोंदणीकृत बांधकाम कामगारांना राज्य सरकारच्या वतीने अर्थसाह्य देण्यात आले आहे. मागील चार दिवसांमध्ये कामगार विभागाच्या वतीने १३७ कोटी ६१ लाख रुपयांचा निधी थेट बांधकाम कामगारांच्या खात्यात जमा झाल्याची माहिती राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.
राज्यात कोविड संकट असल्याने कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. या काळात महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला होता. या निर्णयानुसार महाराष्ट्र इमारत, बांधकाम व इतर कामगार कल्याणकारी मंडळातर्फे नोंदणीकृत कामगारांच्या खात्यात १५०० रुपयांचे अर्थसाह्य त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये थेट जमा करण्यात आले आहेत. त्यानुसार, राज्य सरकारच्या कामगार विभागाच्या वतीने हे पैसे थेट बांधकाम मजुरांच्या खात्यात जमा झाल्याची माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.