संपादक: मोईन सय्यद/पालघर प्रतिनिधी: प्रमोद तिवारी
२२ जुलै २०२१ दरम्यान झालेल्या मुसळधार पावसाने रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील महाड, चिपळूण परिसरातील बहुसंख्य गांवाना महापुरांचा फटका बसला असून अनेक गावांतील कुटूंब उध्वस्त होऊन जीवीत हानी ही मोठ्या प्रमाणात झाली आहे, या महापुरात उध्वस्त झालेल्या लोकांना अनेक सेवाभावी संस्थानी मदतीचा हात दिला आहे.
सर्वत्र मदतीचा ओघ वाढत असून, ठाणे-पालघर जिल्हा ग्रामीण येथील मुस्लिम उत्कर्ष संघटना (तंझिम) या संघटनेने कोकणातील महापुरात नुकसान झालेल्या कुंटूंबियांना अन्नधान्य, कपडे, औषधी व गरजू वस्तू उपलब्ध करून दिल्या आहेत, असे तंझिम संघटनेचे अध्यक्ष समीर डांगे यांनी एका लेखी पत्राद्वारे सांगीतले आहे.
महाड आणि चिपळूण मधील मोहल्ले पुरग्रस्त झाले असून तंझिम संघटनेचे पदाधिकारी येथील पांसरे, खारखेड मोहल्ला, मधारी नाका, कोंडवीते, राजवाडी, पेठमाप, मिठानगरी, तरे मोहल्ला, काशीगांव, मेबल मोहल्ला ह्या ठिकाणी पुराचे पाणी उतरत असतांना त्यात अडकलेल्या लोकांना अन्न- धान्य, खाऊ, पिण्याचे पाणी उपलब्ध करून येथील चिखलमय परिसरातील लोकांना आरोग्याचे दृष्टिने मोबाईल व्हँनसह डॉक्टर व औषधांचे वाटप करण्यात आले.
तंझिम मदत कार्याचे, मुंबई जामा मशिदीचे मुफ्ती अशफाक, अहमद काझी यांचे मार्फत चिपळूणचे मौलाना इलियास, मौलाना सादिक व नगरसेविका हमिदा शेखनाग यांनी कौतूक केले.
या कामात तंझिमचे सरचिटणीस ईस्माईल खान, शाहिद मुल्ला, तकी नाचन, शादाब पटेल, मोहसीन मुरूमकर, जुबेर बोटके, डॉ. इरफान पटेल यांनी मोलाचे सहकार्य केले.