संपादक: मोइन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
मुंबई-नाशिक महामार्गावर टेम्पो चालकास जबरीने लुटणाऱ्या ३ जणांना कोनगाव पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यातील मोबाईल व रोख रक्कम हस्तगत केली आहे.
याबाबत हाती आलेले वृत्त असे आहे कि, फिर्यादी हे त्यांच्या टेम्पोमधून आग्रा येथून बटाट्याचा माल भरून कल्याण येथे नाशिक मुंबई रोडने जात असताना सरवलीपाडा येथे त्यांच्या गाडीच्या पाठीमागून मोटार सायकलवरून तीन जणांनी येऊन फिर्यादीस ओरडून ‘गाडी रोक तुमने हमे कट क्यू मारा’ असे म्हणत फिर्यादी आणि साक्षीदार यांना मारहाण करून फिर्यादी यांचा मोबाईल आणि रोख रक्कम जबरीने काढून घेतले व टेम्पोची काच फोडून नुकसान केले असल्याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून ३ जणांना अटक करून त्यांच्याकडून मोटार सायकल, मोबाईल, रोख रक्कम असा एकूण ३४,८००/- रु. चा मुद्देमाल जप्त केला आहे.