Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

राज्यातील १४ महापालिकांची आज आरक्षण सोडत..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची प्रक्रिया राबविण्यात येत असून, मुंबई महापालिकेसह राज्यातील १४ महापालिकांच्या निवडणुकांसाठी आज आरक्षण सोडत जाहीर करण्यात येत आहे. तर आता नेत्यांची धाकधूक वाढली असून, मुंबई महापालिकेच्या २३६ प्रभागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.

मुंबई पालिकेकडून आज मंगळवारी २३६ प्रभागांसाठी आरक्षण सोडती निघणार आहे. त्याविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीविषयी प्रक्रिया सुरू केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १४ महापालिकांना ३१ मेपर्यंत आरक्षण सोडत जाहीर करण्याचा आदेश दिला होता. ही सोडत शालेय विद्यार्थ्यांचा हस्ते काढली जाणार आहे. शालेय विद्यार्थ्यांकडून आरक्षणाच्या चिठ्ठ्या उचलण्यात येणार आहेत. सर्वप्रथम अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व त्यानंतर महिला आरक्षणासाठी सोडत काढली जाणार आहे.

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसंदर्भात आज, मंगळवारी वाढीव नऊ प्रभागांसह एकूण २३६ प्रभागांसाठी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात सकाळी ११ वाजता सोडतीचे आयोजन केले आहे. ही सोडत काढताना गेल्या तीन निवडणुकांत सलग दोन वेळेस पुरुष किंवा महिला आरक्षण असलेल्या प्रभागांतील आरक्षण यंदा बदलले जाईल. या आरक्षण सोडतीवर सर्वच राजकीय पक्ष, नेते, नगरसेवकपदाच्या शर्यतीत असलेल्या सर्व उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *