संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
समाज माध्यम क्षेत्रातील बड्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये सध्या नेतृत्व बदलाचे वारे वाहत आहेत. फेसबुकची मुळ कंपनी असलेल्या ‘मेटा’ च्या भारतातील प्रमुखपदी आता संध्या देवनाथन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या त्या ‘मेटा’ एशिया पॅसिफीकच्या गेमिंग बिझनेसची जबाबदारी सांभाळत आहेत. जानेवारीपासून त्या ‘मेटा’च्या भारतातील प्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारतील.
अनेक हाय प्रोफाइल व्यक्ती ‘मेटा’ कंपनीतून बाहेर पडल्यानंतर संध्या देवनाथन यांची भारतातील प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे. ‘मेटा’चे भारतातील प्रमुख अजित मोहन, सार्वजनिक धोरणासाठी कंट्री लीड राजीव अग्रवाल आणि ‘व्हॉट्सऍप’ चे भारत प्रमुख अभिजित बोस यांनी ‘मेटा’ मधुन राजीनामा दिला आहे. अजित मोहन यांनी प्रतिस्पर्धी कंपनी ‘स्नॅपचॅट’ मध्ये प्रमुख भूमिका घेण्यासाठी राजीनामा दिला, तर इतर दोन राजीनाम्यांची कारणे अद्याप अज्ञात आहेत. काही दिवसांपूर्वीच ‘मेटा’ने ११ हजार कर्मचाऱ्यांना नोकरी वरून काढून टाकल्याचे वृत्त आहे.
मेटा कंपनी बाबत जाणून घ्या
फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सऍप ही लोकप्रिय सोशल मीडिया ऍप्स ‘मेटा’ कंपनीच्या मालकीची आहेत. मार्क झुकरबर्ग हा ‘मेटा’चा संस्थापक आहेत. ‘मेटा’ एक अमेरिकन बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान समूह असून मेन्लो पार्क, कॅलिफोर्निया येथे कंपनीचे मुख्यालय आहे.